पुणे शहर

श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करीत रंगभूमीवरील एका नव्या पर्वाचा प्रशांत दामले यांनी केला श्रीगणेशा..

पुणे : pune city कोरोनाच्या संकटामुळे नाट्यगृह बंद असल्याने बरेच दिवस नाटकाचे प्रयोग बंद होते. पण आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने २२ ऑक्टोबर पासून नाट्यगृह सुरू होत आहेत, त्यामुळे रंगभूमीवर नाटकांचे प्रयोग सुरू करण्यापूर्वी अभिनेते प्रशांत दामले यांनी कलाकारांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करीत रंगभूमीवरील एका नव्या पर्वाचा श्रीगणेशा केला आहे.

https://fb.watch/8BhSovy8Zk/

खूप काळाच्या प्रतिक्षेनंतर आता मराठी रंगभूमीवरील पडदा वर जाणार आहे, परत रंगमंच प्रकाशाने उजळून जाणार आहे आणि रसिकांचे रंजन करायला नाट्यकर्मी सज्ज होणार आहेत.

आज ‘ एका लग्नाची पुढची गोष्ट ‘ आणि ‘तू म्हणशील तसं ‘ ह्या दोन सदाबहार नाटकांच्या कलाकारांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत रंगभूमीवरील एका नव्या पर्वाचा श्रीगणेशा केला. ह्या नाटकांना, रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत राहो अशी प्रार्थना यावेळी गणेशाच्या चरणी करण्यात आली.

यावेळी प्रशांत दामले यांच्या समवेत अभिनेत्री कविता लाड, संकर्षण कऱ्हाडे, अतुल तोडणकर, नाट्य निर्माता समीर हंपी व इतर कलाकार उपस्थित होते.

Img 20211005 wa0014

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये