कोथरुड
भाजप स्वच्छ भारत अभियान शहर अध्यक्षपदी कांचन कुंबरे यांची निवड

कोथरूड : भारतीय जनता पक्षाच्या स्वच्छ भारत अभियान पुणे शहर अध्यक्षपदी कांचन कुंबरे यांची निवड करण्यात आली आहे.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र फडके,यशवंत सिंग दरबार खासदार व राष्ट्रीय संयोजक, स्वच्छ भारत अभियान, धनंजय दगडे पाटील संयोजक प्रदेशाध्यक्ष, स्वच्छ भारत अभियान महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.
कुंबरे म्हणाल्या, पक्ष व पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या या संधीला न्याय देण्याचा मी सर्वेतोपरी प्रामाणिक प्रयत्न केला. याच प्रयत्नांची दखल घेत आज मला स्वच्छ भारत अभियान पुणे शहर अध्यक्ष हे पद देवून नवीन जबाबदारी विश्वासाने माझ्याकडे सोपविण्यात आली.या पदाला देखील माझ्या कार्य पध्दतीने मी योग्य न्याय देईन हा विश्वास व्यक्त करते.




