पुणे शहर

मनसे कोथरूड विभागाच्या वतीने ‘सर्व काही “ती” च्या साठी..’  व्याख्यानाचे आयोजन; शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागाच्या वतीने शर्मीला राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सर्व काही “ती” च्या साठी..’  हा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
          
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहास परळीकर ( हिंदू जागरण मंच छत्रपती संभाजी भाग प्रमुख) तसेच प्रमुख वक्ते योगेश चिले (मनसे राज्य प्रवक्ते आणि शहराध्यक्ष पनवेल) हे होते.
सध्याची सामाजिक परिस्थिती व महिला वर्ग ह्या विषयावर मान्यवरांची भाषणं झाली. लव जिहाद, लँड जिहाद ही संकल्पना नक्की काय आहे आणि कशा प्रकारे समाजात फोफावते आहे. या विषयावर काम कसे करायला हवे याच मार्गदर्शन परळीकर ह्यांनी दिले.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

तर मुख्य व्याख्याते ह्यांनी लव जिहाद, लँड जिहाद, धर्म-परंपरा व सद्यस्थिती ह्याचे विश्लेषण शिवकालीन दाखले व पुरावे देत जनते समोर मांडले. ताथवडे उद्याना जवळील, युनायटेड वेस्टर्न हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. या वेळी नागरिकांनी, विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कोथरूड विभागात असे अजून कार्यक्रम राबवणार आहोत असे मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे, सरचिटणीस हेमंत संभुस, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मा.नगरसेविका पुष्पा कनोजिया  विभाग अध्यक्ष श्री सुधीर धावडे , महिला विभाग अध्यक्ष सुरेखा होले, मनविसे  राज्य संघटक प्रशांत कनोजिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनसे शाखाध्यक्ष हर्षद खाडे यांनी केले. तसेच हा कार्यक्रमाचे आयोजन मनसे कोथरूड विभागातर्फे उपविभाग अध्यक्ष दत्ता पायगुडे, हर्षद खाडे, श्रीयश राऊत आणि गौरव कुलकर्णी आणि प्रणव रानडे यांनी केले होते.

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये