पुणे शहर

कर्वेनगरमध्ये सीसीटिव्हीचे लोकार्पण आणि रस्ता दुभाजक सुशोभीकरणाचे उदघाटन

स्थानिक नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्या प्रयत्नातून झाले काम

पुणे : कर्वेनगरमधील स्थानिक नगरसेवक राजाभाऊ बराटे यांच्या प्रयत्नातून कर्वेनगर प्रभागातील सीसीटीव्ही चे लोकार्पण तसेच वनदेवी मंदिर ते काकडे सिटी रस्ता दुभाजकावर सुशोभिकरण करण्यात आलेल्या कामाचे उद्घाटन पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते झाले.

Img 20220314 wa00082359887369364273223
कर्वेनगर ग्रामस्थांच्या वतीने पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेवक दीपक पोटे, वारजे पोलिस स्टेशनचे सीनियर पी आय शंकर खटके,माजी नगरसेवक शिवरामभाऊ मेंगडे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संचालक किरण बराटे, बापूसाहेब मेंगडे, सरचिटणीस विठ्ठल बराटे, प्रभाग अध्यक्ष हेमंत बोरकर ,लक्ष्मण बराटे ,शिवाजी बराटे बंडा बराटे, हिंदुराव पाटील, विनोद मोहिते, पोपट बराटे ,संभाजी बराटे, गणपत सुतार, गणेश पासलकर, कल्पना पुरंदरे, डॉ. एकता रामदासी, महेश पवळे, दशरथ फेंगसे, विजय फेंगसे, सुरेश बराटे, सुनील बराटे, हरिभाऊ बराटे, हिरामण सुतार, माधव बराटे, जनार्दन बराटे, सूर्यकांत टुले, सतीश झांजड, ऋषिकेश बराटे, अजय बराटे व कमिन्स मित्र परिवार उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल रामदासी यांनी केले, व आभार हेमंत बोरकर यांनी केले.

Img 20220314 wa00096049736618861611944

कर्वेनगर भागातील ज्ञानदीप कॉलनी, कॅनॉल वरील १ ते १० गल्ली, कर्वेनगर गावठाण परिसर, गुलाबराव ताठे चौक, श्रीमान चौक, मावळे आळी चौक, काकडे पॅलेस, कर्वेनगर मुख्य चौक असे एकूण ४८ सिसी टिव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याचे युनिट कर्वेनगर पोलीस चौकीत बसवण्यात आले आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये