आंतरराष्ट्रीय

नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का, ६ जणांचा मृत्यू

काठमांडू/नवी दिल्ली : नेपाळमध्ये पहाटे भूकंपाचा धक्का बसला असून यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील डोटी जिल्ह्यात काही घरेदेखील पडली आहेत. ६.३ रिश्टर स्केलच्या या भूकंपाचे हादरे राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही बसले आहेत.

नेपाळमधील डोटी जिल्ह्यामध्ये पहाटेच भूकंप झाल्याची घटना घडली. या भूकंपात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नेपाळच्या लष्कराकडून बचावकार्य केले जात आहे. या भूकंपात अनेक घरेदेखील जमीनदोस्त झाली आहेत. या भूकंपाचे सौम्य धक्के रात्री २ वाजता राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही जाणवले.

Fb img 1647413711531 1

या भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली असल्याची माहीती येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपामध्ये मृत्यू झालेल्यांची ओखळ अद्याप पटलेली नाही. मात्र मृतांमध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.

Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये