महाराष्ट्र
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे नियुक्ती
करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्त करण्यात आल्याचं पटेल यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठ सुरुवात केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वातावरण चिघळणार असल्याचं दिसत आहे. जे शिवसेने बरोबर झालं तेच इथे होताना दिसत आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध शरद पवार हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.







