राजकीय

भाजपचे धनंजय महाडिक विजयी, आमदार फोडण्यात यश, संजय पवार पराभूत

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीची ९ ते १० मतं मिळवण्यात यश आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आलं आहे. भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर, संजय पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महाविकास आघाडीचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मतं मिळाली होती. तर, धनंजय महाडिक यांना २७ मतं मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.

पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना ४८ मतं मिळाली. तर, शिवसेनेचे संजय राऊत यांना ४१, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांना ४३ तर काँग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना ४४ मतं मिळाली आहेत. महाविकास आघाडी सरकारसोबत असलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे. भाजपच्या १०६ मतांशिवाय त्यांना अधिकची मतं १७ मिळवण्यात यश आलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक ही केवळ लढविण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढविली होती, जय महाराष्ट्र, अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पियूष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. मागील वेळी राज्यसभेच्या नेतेपदी निवड करुन मोदींनी हेच अधोरेखित केलं. पियूष गोयल यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दपूर्ण संबंध विचारात घेऊन, त्यांच्यावर ही जबाबदारी दिली गेली. ही जबाबदारी पीयूष गोयल यांनी उत्तमरित्या सांभाळली. सध्या त्यांच्यावर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आहे. आता ते पुन्हा खासदार झाले आहेत. पियुष गोयल यांना ४८ मतं मिळाली आहेत.भाजपनं माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली होती. अनिल बोंडे देखील विजयी झाले आहेत. अनिल बोंडे यांना ४८ मते मिळाली आहेत

कसे सुरू आहे पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पहा व्हिडिओ
Img 20220518 wa00135092505186750304354 2
Img 20220603 wa0217

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये