पुणे शहर

पुणे शहर शिवसेनेची पूरग्रस्तांसाठी पहिली कुमक रवाना..

पुणे : पुणे शहर शिवसेनेची पूरग्रस्तांसाठी पहिली कुमक रवाना झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त “कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम न करता पुरग्रस्तांना मदत करावी आणि आपल्या मराठी बांधवांचे अश्रु पुसावेत” असे आवाहन पुणे शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.

महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली असून अनेकजण बेपत्ता आहेत.अचानक आलेल्या या अस्मानी संकटाचा सामना  करताना इथल्या आपल्या बांधवाना भावनिक-मानसिक-आर्थिक-वैद्यकीय आधाराची गरज ओळखून चार डॉकटर, रूग्णवाहिका, औषधोपचार वैद्यकीय साहित्य, प्रथमोपचार किट, सॅनिटरी नॅपकिन घेउन पहिली कुमक सांगली, सातारा, कोल्हापूर, येथे रवाना झाली. या आपत्तीग्रस्त बांधवांचे अश्रु पुसण्यासाठी पुणेकरांनी  जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी असे आवाहन या प्रसंगी पुणे शहर शिवसेना प्रमुख संजय मोरे यांनी केले..

WhatsApp Image 2021 07 27 at 8.25.56 AM

या वैद्यकीय मदत पथकाचे नेतृत्व शिवसेना पुणे उपशहर प्रमुख डाॅ.अमोल देवळेकर हे करणार आहेत.आगामी काळात मदत करणाऱ्या वेगवेगळ्या टिम रोज रवाना होणार आहेत या कामात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी पुणे शहर शिवसेना कार्यालय किंवा होप हाॅस्पिटल नाना पेठ येथे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले..

WhatsApp Image 2021 07 27 at 8.26.19 AM

या प्रसंगी कॅन्टोन्मेंट विभाग शिवसेना संपर्क प्रमुख मा.दिलीपराव तांबोळी,विधानसभा प्रमुख अभय वाघमारे,विभाग प्रमुख उत्तम भुजबळ,अनिल दामजी,राजेश मोरे,राहूल जेटके यांचेसह युवा सेना पदाधिकारी सनी गवते,अक्षय फुलसूंदर,सत्यम  सोनवणे तसेच इतर शिवसेना पदाधिकारी रमेश परदेशी,परवेश राव,नितिन दरेकर,अजय परदेशी,निलेश कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते..

IMG 20210727 WA0218

▪️आवश्यक वस्तू:कपडे,रेडी फूड,साबण,टूथपेस्ट,तेल,
सॅनिटरी नॅपकिन,पिण्याचे पाणी,औषधे,ड्रेसिंगसाहित्य, रेन कोट,छत्री,टॉर्च इत्यादी..
▪️मदतकार्य सहभागासाठी संपर्क:
-पुणे शहर शिवसेना कार्यालय डेक्कन
-होप हाॅस्पिटल नाना पेठ
-मा.संजय मोरे यांचे संपर्क कार्यालय
▪️संपर्क क्रमांक:
+91 97630 02921
9422007184

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये