पुणे शहर

ब्राह्मण महासंघाने पूरग्रस्तांसाठी अवघ्या २४ तासात मदत जमा करून चिपळूणला मार्गस्थ केली.

पुणे : पाठीशी एक कर्ण हवा. मग नैसर्गिक आपत्ती हे संकट न वाटता फक्त आव्हान वाटतं आणि आपण तर शेकडो वर्षे अशी अनेक आव्हाने जमिनीत गाडतच जिंकत आलो आहोत. भगवान परशुरामांच्या कोकणच्या मदतीसाठी आवाहन केले अनेक कर्ण उभे राहिले.काहींनी  रक्कम बँक खात्यात जमा केली तर अनेकांनी वस्तू, धान्य पासून ते नवीन कपडे, औषधे पर्यंत उपलब्ध करून दिले. सहज हिशोब केला तर आज ब्राह्मण महासंघाची टीम चिपळूणसाठी निघाली आहे.  ट्रक मध्ये निघालेल्या वस्तूंची किंमत 4 लक्ष पर्यंत आहे. अशी माहिती ब्राह्माण महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांनी दिली आहे.

या साहित्यामध्ये 300 कुटुंबाना एका महिन्याचे किराणा किट,  500 kg गहू, 300 kg तांदूळ, 200 kg पीठ, तेल, तूप,नवीन साडया,नवीन ड्रेस, 200 बाटल्या फिनेल, पाणी बाटल्या अशा 175 वस्तूंचे मिळून  4 लाख रुपयांचे सामान आज ब्राह्मण महासंघाच्या वतीने ट्रकने चिपळूण साठी निघाले आहे.

दवे म्हणाले, केवळ 24 तासात एवढी मोठी मदत उभं राहण हे परमेश्वराच्या आशीर्वाद शिवाय शक्यच नसते.आणि महासंघला असा आशीर्वाद अनेक वेळा मिळाला आहे मग ती पुरोहित मदत असो की शिक्षण किंवा वैद्यकीय मदत.कर्ण पाठीशी उभेच असतात.आज चिपळूण साठी चा पहिला ट्रक निघाला आहे. कोल्हापूर साठी सुद्धा पण 2/3 दिवसात काही मदत पाठवण्याचा प्रयत्न आहे..

WhatsApp Image 2021 07 27 at 8.25.56 AM
WhatsApp Image 2021 07 27 at 8.26.19 AM

       परंपरे प्रमाणे सर्व देणगीदारांची नावे 3/4 दिवसात घोषित करण्यात येतील.आणखीन कोणाला मदत करायची इच्छा असल्यास पुढील अकाउंटला पैसे जमा करावेत किंवा पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा असे आवाहन दवे यांनी केले आहे.
Brahman mahasangh
A/c no 078010101655529
Ifsc code DNSB0000078
DNS Bank, hingne Branch, Pune
    

IMG 20210727 WA0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये