ग्लोबल मेयर चॅलेंज’ स्पर्धेत पुणे अंतिम फेरीत ; जगभरातील ६३१ शहरांमधून ५० शहरांच्या यादीत पुणे

पुणे : कोविडचे महाकाय संकट समोर असताना न डगमगता जगभरातील विविध शहरांच्या महापौरांनी शहराच्या दीर्घकालीन हिताचे निर्णय नजरेआड होऊ दिले नाही, अशा अभिनव कल्पना जाणून घेण्याच्या हेतूने ‘ब्लूम्बर्ग फिलाँथ्रॉपीज’ या संस्थेकडून दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी घेतलेल्या ‘२०२१ ग्लोबल मेयर चॅलेंज’ स्पर्धेत जगातील ६३१ शहरांमधून अंतिम फेरीच्या ५० शहरांच्या यादीमध्ये पुणे शहराचा समावेश करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. Pune in the final of the Global Mayor’s Challenge competition
मोहोळ यांनी सांगितले की, कोरोना काळात शहरांनी कोणत्या अभिनव कल्पना मांडल्या व त्यासंदर्भात काय निर्णय घेतले? याची जागतिक पातळीवर नोंद व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जगातील तब्बल ६३१ शहरांनी कोरोना काळातही राबविलेल्या अभिनव योजनांविषयी अर्जाद्वारे माहिती दिली. या स्पर्धेची पहिली फेरी पूर्ण झाली. यातून ५० शहरांची नावे जाहीर झाली. त्यात पुण्याचा समावेश आहे.

प्रदूषण रोखणे आणि शहरातील हवेचा दर्जा उंचावण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारणे आणि त्यासाठी आपण विविध माध्यमातून प्रयत्न करत आहोत. याच विषयाच्या अनुषंगाने आपण स्पर्धेत सहभागी झालो आहोत. या स्पर्धेत पुण्याचा पहिल्या १५ शहरांत समावेश झाल्यास पुण्याचा अनोखा सन्मान होऊ शकेल. असे मोहोळ यांनी म्हंटले आहे.



