महाराष्ट्र

महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार

पुणे : महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, मुंबई, ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या 14 महापालिकांच्या अंतिम प्रभागरचना 17 मे रोजी जाहीर होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. यासंदर्भात पुणे महापालिकेला आदेश प्राप्त झाले आहेत. ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि राज्य सरकारने निवडणुका घेण्याचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होणार असे चित्र निर्माण झाले. दरम्यान पावसाळ्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे त्या सप्टेंबरमध्ये होतील, अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये निवडणुका कधी होणार? हा प्रश्न अद्यापही कायम आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे.

हरकती सूचनांनंतर ‘यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांनी त्यांच्या समितीचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे. यामध्ये पुणे मध्यवर्तीसह कोथरूड, बाणेर, बालेवाडी, हडपसर यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात बदल सुचविले असल्याची चर्चा आहे. हा अहवाल दिल्यानंतरही अद्याप अंतिम प्रभाग रचना निश्चित झालेली नाही असे असताना मंगळवारी मुंबईत निवडणूक आयोगाने बैठक बोलावली होती. त्याच वेळी अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुढील आठवड्याभरात निवडणूक आयोगाकडून आरक्षणाची सोडत काढली जाईल. त्याच वेळी मतदार याद्या फोडून त्यावर हरकती सूचनांची कार्यवाही पुढील 10 दिवसात होऊ शकते. त्यामुळे जूनमध्ये निवडणूक होऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये