पुणे शहर

24×7 पाणी पुरवठा योजनेच्या कामावर पालिकेचे नियंत्रण नाही : दिपाली धुमाळ.

पुणे : पुणे शहरात महापालिकेच्या वतीने 24×7 समान पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून  L&T कंपनीच्या  वतीने विविध ठिकाणी पाण्याच्या पाईप लाईन टाकण्याचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असून त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना या प्रकाराचा प्रचंड त्रास होत असून या कामावर महापालिकेचे नियंत्रण नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.

धुमाळ यांनी म्हंटले आहे की L&T कंपनीच्या च्या वतीने सुरू असलेल्या या कामावर महापालिकेचे कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे तयार झाले असून वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.  कुठे, कशी , किती व्यासाची जलवाहिनी कोणत्या रस्त्यावर टाकायची आहे याचा कसलाही आराखडा नाही.  जिथे रस्ता दिसेल तिथे नियोजन शून्य काम सुरू आहे. 

ज्याठिकाणी काम सुरू आहे तेथील स्थानिक अधिकाऱ्यांना, नगरसेवकांना कसलीच कल्पना नसते.  नागरिकांनी तक्रारी आल्यानंतर तेथिल संबंधित अधिकारी यांना माहित होते.  ज्या मनपाच्या अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्याला सूध्दा काम कुठे सुरू आहे ते माहित नसणे म्हणजे पालिकेचा किती गलथान कारभार सुरू आहे हेच दिसून येत आहे. 

शहरात कोरोना बरोबरच डेंग्यु व मलेरिया चे सुध्दा रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याकडे ही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात ज्या ठिकाणी पाईप लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदलेले आहेत त्याठिकाणी सांडपाणी साठत असल्याने रोगराई वाढण्याचा धोका आहे. त्याकडेही प्रशासनाचे लक्ष नाही. अनेक ठिकाणी वारंवार खोदाई करून अर्धवट कामे सोडलेली आहेत.  चुकीच्या ठिकाणी पाण्याच्या लाईन टाकल्या गेल्या व चुक लक्षात आली की पुन्हा ती खोदाई बुजवण्यात आल्याचे प्रकारही घडले असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

यामुळे चांगले रस्ते आवश्यक नसतांना खोदले जातात त्यामुळे अपघात होत आहेत. याविषयी पाणी पुरवठा अधिकारी यांच्या कडे चौकशी केली असता सदर संबंधित अधिकारी यांना माहित नसल्याचे सांगितले जात आहे.  
नेमकी L&T पाणी पुरवठा योजनेच्या कामाची जबाबदारी कोणाचं  स्वीकारत नाही त्यामुळे महापालिकेत नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या विषयात महापालिकेच्या आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून हा गलथान कारभार थांबवण्याची मागणी धुमाळ यांनी केली आहे.

पाण्याची लाईन नाही आणि मीटरसाठी आग्रह
अजुन पाण्याच्या लाईन टाकल्या गेल्या जात नाही तोच नागरिकांना पाणी रिडींगसाठी मीटर बसविण्याचे आग्रह प्रशासनाकडून नागरिकांना केला आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय चालू आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये