पुणे शहर

पुणे महापालिकेबाहेर पुणे महानगरपालिका कामगार युनियनचा  आक्रोश मोर्चा..या केल्या मागण्या..  

पुणे : पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) च्या वतीने सफाई व  इतर विभागातील कंत्राटी कामगारांना “सेवेत कायम करा” या मुख्य मागणीसाठी पुणे महानगरपालिके बाहेर आक्रोश निदर्शने करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

भारतीय संविधानाने सर्वांना जगण्याच्या दर्जाची समान संधी व कायम स्वरूपी रोजगार मिळविण्याचा अधिकार दिला आहे प्रत्यक्षात मात्र कंत्राटी कामगारांना ही संधी आजपर्यंत नाकारण्यात आली आहे. या कंत्राटी पद्धतीमुळे कामगार वर्ग हा गुलामगिरीकडे ढकलला जात आहे. २८ जुलै २०२५ रोजी मुंबई महानगरपालिकेतील सुमारे ८ हजार कंत्राटी सफाई कामगारांना कायम करण्याचा करार मुंबईमधील विविध संघटनांबरोबर करण्यात आला. तसेच नागपूर महानगरपालिकेमधील ४५०० कंत्राटी सफाई कामगारांना काम करण्यात आले. तसाच पुणे शहरातील व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी कामगार कायम करण्याचा प्रस्ताव त्या त्या महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांनी राज्य सरकारकडे पाठवावा आणि तो प्रस्ताव राज्य सरकारने कामगार संघटना बरोबर कायम करण्याचा करार करावा अशी मागणी यावेळी केली गेली.

Img 20250508 wa00018046597267745442111

सदर निदर्शनामध्ये मार्गदर्शन करत असताना अध्यक्ष कॉ. उदय भट असे म्हणाले की,” महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी आस्थापनेतील आणि सर्व खात्यातील कंत्राटी कामगारांना कायम करा ह्या मुख्य मागणीसाठी आजचे आंदोलन करत आहोत. मुंबई महानगरपालिकेतील  ८ हजार व नागपूर महानगरपालिकेतील ४५००  कंत्राटी सफाई कामगारांना कायम करण्याचा जो करार मान्यताप्राप्त कामगार संघटना बरोबर केलेला आहे तोच करार पुणे महानगरपालिकेतील सफाई कामगारांना व सर्व खात्यातील कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा करार राज्य सरकारने करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर म्हणाल्या, राज्य सरकारने कंत्राटी कामगारांना रोजगार मिळविण्याचा संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकाराची अंमलबजावणी ताबडतोब करावी आणि कामगार कष्टकरी वर्गाला गुलामासारखी वागणूक देऊ नका माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या…! अन्यथा कामगार वर्ग तुमची सत्ता उलथवून टाकल्या शिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा जनरल सेक्रेटरी यांनी दिला. कंत्राटी कामगांराच्या लढ्याला माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व शिवसेनेच्या सुदर्शना त्रिगुणाईत, सर्वश्रमिक महिला मोर्चाच्या कॉ. मेधा थत्ते यांनी पाठींबा दिला आहे.

यावेळी कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे, जॉईंट सेक्रेटरी कॉ. वैजीनाथ गायकवाड, उपाध्यक्ष कॉ. दिलीप कांबळे, कॉ. करूणा गजधनी, कॉ. शोभा बनसोडे, कार्यालयीन चिटणीस कॉ. राम अडागळे, विभागीय अध्यक्ष कॉ. देवनाथ सद्भभैया, तानाजी रिकिबे, सचिव कॉ.ओंकार काळे, संजय रासगे, सुनिल कांबळे, आण्णा ढावरे, अशोक कांबळे यांनी सभेत मार्गदर्शन केले. युनियनचे इतर पदाधिकारी, सचिव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निदर्शनामध्ये तीन हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले.

Img 20240404 wa0013282295561886146142642027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये