पुण्यात रेल्वेचा २ दिवस मेगाब्लॉक, लोकलसह अनेक गाड्या रद्द

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर खडकी स्टेशन दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासंदर्भात विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. या कारणाने शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर आणि रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला काही गाड्या रद्द होतील, पुनर्निधारित वेळेवर आणि काही विलंबाने चालतील.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर 2023 ला सुटणारी गाडी क्रमांक १२१२३ मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस आणि ११००९ मुंबई- पुणे सिंहगड एक्सप्रेस रद्द राहील.
रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला पुणे- तळेगाव -लोणावळा -पुणे दरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन सर्व ४६ लोकल सेवा गाड्या रद्द राहतील.
रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक १२१२४ पुणे – मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस,११०१० पुणे -मुंबई सिंहगड एक्सप्रेस, ११००७/११००८ पुणे – मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस, १२१२७/१२१२८ पुणे – मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस तथा गाडी संख्या ११०२९/११०३० मुंबई – कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस रद्द राहील.

पुनर्निर्धारित वेळेवर धावणाऱ्या गाड्या
रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक १२९३९ पुणे – जयपूर एक्सप्रेस पुणे येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ १७.३० वाजता ऐवजी दोन तास विलंबाने अर्थात १९.३० वाजता सुटेल.
रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला सुटणारी गाडी क्रमांक २२१५० पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस पुणे येथून निर्धारित प्रस्थान वेळ १८.४५ वाजता ऐवजी एक तास विलंबाने अर्थात १९.४५वाजता सुटेल.
रविवार २६ नोव्हेंबरला दौंड येथून सुटणारी गाड़ी क्रमांक २२९४३ दौंड – इंदौर एक्सप्रेस दौंड वरून निर्धारित प्रस्थान वेळ १४.०० वाजता ऐवजी चार तास विलंबाने अर्थात १८.०० वाजता सुटेल.



शनिवार दिनांक २५ नोव्हेंबरला त्रिवेंद्रम येथून सुटणारी गाड़ी क्रमांक १६३३२ त्रिवेंद्रम – मुंबई एक्सप्रेस त्रिवेंद्रम येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ ०४.२५ वाजता ऐवजी दोन तास विलंबाने अर्थात अर्थात ०६.२५ वाजता सुटेल.
शनिवार दिनांक २५ नोव्हेंबरला ग्वालियर येथून सुटणारी गाडी क्रमांक २२१९४ ग्वालियर – दौंड एक्सप्रेस ग्वालियर येथून तिची निर्धारित प्रस्थान वेळ १७.१५ वाजता ऐवजी दीड तास विलंबाने अर्थात १८.४५ वाजता सुटेल.
उशिराने धावणाऱ्या गाड्या
शनिवार दिनांक २५ नोव्हेंबरला बेंगलुरु येथून सुटणारी गाडी क्रमांक ११३०२ बेंगलुरु – मुंबई उद्यान एक्सप्रेस, बेंगलुरु येथून सुटणारी गाड़ी क्रमांक १६५०६ बेंगलुरु – गांधीधाम एक्सप्रेस आणि रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला मुंबई येथून सुटणारी गाड़ी क्रमांक १११५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- चेन्नई एक्सप्रेस , लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्सप्रेस, मुंबई येथून सुटणारी ११०१९ छत्रपति शिवाजी टर्मिनस मुंबई -भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस आणि मुंबई येथून सुटणारी २२७३२ छत्रपति शिवाजी टर्मिनस मुंबई- हैदराबाद एक्सप्रेस पुणे विभागावर काही उशिराने धावतील.






