पुणे शहर

वारजात रंगणार लहान मुलांनी पहावा असा “आली सुट्टी “चा धमाल प्रयोग.

वारजे : वारजात रंगणार “आली सुट्टी “चा धमाल प्रयोग रंगणार असून या प्रयोगासाठी मुलांची तयारी सुरू आहे. इयत्ता पहिली ते चवथी, पाचवीची मुले, मुली कवयित्री शांता शेळके यांच्या बालकवितांवर आधारलेला “आली सुट्टी! आली सुट्टी ! !”चा प्रयोग सादर करणार आहेत.

रविवार दिनांक २६ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वा ईशाननगरीतील विरंगुळा केंद्र (वारजे) येथे हा धमाल प्रयोग सादर केला जाणार आहे. वारजे साहित्यिक कट्ट्याने हा प्रयोग आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची निर्मिती “अनन्वय”या संस्थेची आहे. संकल्पना व दिग्दर्शन जेष्ठ साहित्यिक माधवी वैद्य यांचे आहे. संगीत राहुल घोरपडे यांचे आहे.नृत्य दिग्दर्शन लहेजा स्कूल ऑफ परफाॕर्मिंग आर्टस संचालक आभा औटी यांनी केले आहे. नाट्य दिग्दर्शन निखिल गाडगीळ यांचे आहे.

Img 20231111 wa0004281292791598778819580777

“अनन्वय ” व “लहेजा”नृत्यालयाचे बाल कलाकार यामधे सहभागी होत आहेत. याच कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून शर्व गाडगीळ उपस्थित राहणार आहे. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ “श्यामची आई” मधील छोटा श्याम शर्व गाडगीळ याचा सत्कार करतील. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

Img 20230717 wa0012281293529283828163631407
Img 20230511 wa0002282293142767040474980887

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये