पुणे शहर

पुणेकरांनो सावधान, रुग्ण वाढताहेत

पुणे : दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये पुणेकरांनी गर्दी केली. त्या गर्दीचे दुष्परिणाम दिसू लागले असून दिवाळी संपताच कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

महापालिकेच्या दैनंदिन अहवालानुसार दिवसभरात ४११ पॉझीटीव्ह रुग्ण नव्याने आढळले आहेत. दिवसभरात डिस्चार्ज ३१६ रुग्णांना देण्यात आला आहे. सध्या पुण्यातील विविध रुग्णालयांत ३८५ क्रिटीकल रुग्ण असून २५० व्हेंटिलेटरवर आहेत. दिवसात सात जणांचा मृत्यू झाला असून त्यात १ रुग्ण पुण्याबाहेरील आहे.एकूण मृत्यू ४ हजार ४०७ झाले आहेत.. शहरात सध्या ४ हजार ४७५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे. प्रशासनाला कडक पावले उचलावी लागतील अशी स्थिती आहे.

Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 35 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये