पुणे शहर

पुण्यात मद्यधुंद PMPML बस चालकाने दहा ते पंधरा गाड्यांना उडवले

पुणे : पुण्यात सेनापती बापट रोडवर PMPML च्या चालकाने मद्यपान करून बस चालवल्याने भीषण अपघात झाला आहे. पीएमपीएल बस चालकाने १० ते १५ गाड्यांना उडवलं आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणातील घटनेची आठवण ताजी झाली आहे. बसमधील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.


घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चालक पीएमटी बसमध्ये चढला. मात्र तो दारूच्या नशेमध्ये होता. त्यानंतर त्याने बस उलट्या दिशेनं चालवायला सुरुवात केली. या घटनेमध्ये त्यानं एका गाडीला उडवलं. या बसमध्ये ५० प्रवासी होते. प्रकार लक्षात येताच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, बचावासाठी आरडा-ओरड सुरू झाली. कृष्णा जाधव यांनी जीवाची परवा न करता बसवर नियंत्रण मिळून लोकांचा जीव वाचवला. निलेश सावंत असं या चालकाचं नाव आहे.

Img 20230717 wa0012281294517541507444836162

या प्रकरणात चालकाविरोधात चतुर्शंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. चालकानं सुरुवातीला सुसाट वेगानं बस उलटी चालवली आहे, त्यानंतर त्याने पुन्हा वेगात बस पुढे नेल्याचं कॅमेऱ्यात दिसत आहे. प्रवाशी मदतीसाठी आरडा-ओरड करत असल्याचं देखील पहायला मिळत आहे.

Img 20231019 wa00028359819733516444269
Img 20230511 wa0002282292294772633607891151

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये