नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला साथ द्या ; सुनेत्रा पवार

वारजेत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा सोसायटी मधील नागरिकांशी संवाद
वारजे : बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला विधानसभा मतदार संघ हा आजपर्यंत भाजप उमेदवाराला लीड मिळवून देणारा भाग राहिला आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत या निवडणुकीत भाजप नाही तर महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. आतापर्यंतच्या झालेल्या निवडणुकांप्रमाणे याही निवडणुकीत या मतदार संघातून महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळवून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.
सोमवारी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी वारजे परिसराचा दौरा केला. दिवसभर त्या वारजे परिसरात होत्या. या दौऱ्यात त्यांनी वारजेतील प्रमुख नागरिकांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्याबरोबरच त्यांनी वेस्ट विंड, हिल व्ह्यू, मेघ मल्हार, साई सयाजी टॉवर, साई सयाजी नगर, महालक्ष्मीनगर, शोबापुरम, सोसायट्यांमधील मधील बैठकांना उपस्थित राहत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर बसवण्यासाठी व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एक मत महायुतीच्या उमेदवाराला देण्याचे आवाहन केले.

यावेळी आमदार भिमराव तापकीर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, आर पी आय आठवले गटाच्या नेत्या संगीता आठवले, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, दिलीप बराटे, दिपाली धुमाळ, किरण बारटक्के, शुक्राचार्य वांजळे, सचिन दांगट, वासुदेव भोसले, बाळासाहेब बराटे, माणिक दुधाने, प्रतीक नलावडे, भावना पाटील, निलेश घारे आदी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ म्हणाले, मतदार संघात महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. सुनेत्रावहिनी पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानुसार यंत्रणा काम करत असून नियोजनबध्द प्रचार केला जात आहे.









