फिरायला जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवस क्वारंटाईन करणार – अजित पवार

पुणे: शनिवार आणि रविवारी पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीला चाप लावण्यासाठी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. पुण्यात शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
शनिवार आणि रविवारी पुणे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीला चाप लावण्यासाठी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली.शनिवारी आणि रविवारी पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

पवार म्हणाले, पर्यटन स्थळी वाढणारी गर्दी चिंतेची गोष्ट आहे. कोरोना चा प्रभाव अद्याप ही कमी झाला नाही. त्यामुळे विनाकारण फिरायला जाणाऱ्या नागरीकांना १५ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे.


