पुणे शहरराजकीय

कोथरूड मध्ये शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; पोस्टर वरून रंगला वाद

पुणे : कोल्हापूर मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत कॉग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी झाल्यानंतर शिवसेनेकडून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठया प्रमाणात ट्रोल (troll )करण्यास सुरुवात झाली आहे. यातच कोथरूड भागामध्ये शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते. यावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

कोथरूड भागातील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संपर्क कार्यालयाजवळील  कर्वे पुतळा चौकात  शिवसेनेच्या वतीने पाटील यांच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले होते. यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि शिवसैनिकांनी  लावलेला पोस्टर काढल्याने उपस्थित शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. माञ कोथरूड पोलीसांनी तातडीने घटनास्थळी पोहचत वाद मिटविला.

भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि शिवसैनिक समोरा समोर आल्याने दोन्ही बाजूने बाचाबाचीस सुरूवात झाली. यामुळे भाजपसेनेमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी काळजीपूर्वक परिस्थिती हाताळल्याने काही वेळातच तणाव निवळला. परंतू आगामी काळातील महापालिका निवडणुकीमध्ये कोथरूडमध्ये भाजप- शिवसेनेमध्ये रस्त्यावरची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Fb img 1648963058213
Img 20220414 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये