कोथरुड

गरीब कुटुंबांना महापालिकेची वैद्यकीय सहाय्य योजना काढून देण्याचा नितीन ननावरे यांचा स्तुत्य उपक्रम..

कोथरुड : वाढदिवस सध्या पद्धतीने साजरा करत शिवसंग्राम संघटनेचे युवक आघाडीचे शहराध्यक्ष नितिन ननावरे यांनी  पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गरीब कुटुंबांना महापालिकेची वैद्यकीय सहाय्य योजना मोफत काढून देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

दारिद्रयरेषेखालील पिवळे रेशनकार्डधारक व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापर्यंत असणाऱ्या गरीब कुटुंबांना या वैद्यकीय सहाय्य योजना निधीचा लाभ मिळत असतो. या वैद्यकीय योजनेसाठी लागणारे माफक शुल्क ननावरे यांचेकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर या योजनेचे कार्ड नागरीकांना मिळू शकणार आहे.

Img 20210223 wa0156

अर्ज भरुन द्यायची अंतिम तारीख
९ एप्रिल २०२१ ते ३० मे २०२१ अशी ठेवण्यात आली असून  गरजू कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अर्जासाठी लागणारे कागदपत्रे म्हणजे
पुणे मनपा वस्तीमध्ये राहत असल्याचे ओळखपत्र किंवा ग.व.नि. विभागाची सेवा शुल्क भरलेली पावती किंवा दारिद्रय रेषेखालील असलेले रेशनकार्ड पुरावा, पुणे मनपाच्या कार्यक्षेत्रात राहत असलेल्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापर्यंत असलेला तहसीलदार, पुणे यांचा दाखला, रेशनकार्ड, अपत्यांचे जन्माचे दाखले. कुटुंबांचे पात्र सर्व सभासदांचे एकत्रित दोन फोटो. अशी कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन नितीन ननावरे यांनी केले आहे. Commendable initiative of Nitin Nanavare to provide free pmc medical aid scheme to poor families.

अधिक माहितीसाठी संपर्क

अल्ताफ शेख –८३७८८३०४५२
हैदर नदाफ – ८२०८५८५०५८
सिध्दार्थ शेट्टी – ९६३७७४०१२३
संकेत ढवळे – ७८८७९२८५१५
प्रशांत सुर्वे – ९३५९२८०६००
राजू नंदीवाले- ९९७५३७३५७५

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये