पुणे शहर

बंद पडलेली रेशन कार्ड हर्षवर्धन मानकर यांच्या प्रयत्नांमुळे सुरू ; धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा..

कोथरुड : कोरोना काळात प्रभाग क्रमांक ११ मधील बऱ्याच नागरिकांना रेशन कार्ड असून देखील काही तांत्रिक अडचणींमुळे हक्काचे अन्नधान्य मिळत नव्हते. हर्षवर्धन मानकर यांनी याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शंभरच्यावर बंद पडलेली रेशनकार्ड पुन्हा चालू करण्यात आली आहेत. रेशन कार्ड सुरू झाल्याने आता नागरिकांना अन्न धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Ration card started due to the efforts of Harshvardhan Mankar

साधारण शंभरच्या वर  कुटुंबांची संख्या रेशन कार्ड बंद पडल्याने त्यांना कोरोना च्या संकट काळात रेशनिंग चे धान्य मिळू शकले नाही. ही बाब हर्षवर्धन मानकर यांना कळल्यानंतर त्यांनी संबधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा केल्यानंतर ही रेशनकार्ड पुन्हा सुरू केली गेली आहेत. यामुळे संबधित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  आता या नागरिकांना कायमस्वरूपी धान्य मिळण्याची व्यवस्था झाली असून बरेच दिवस बंद पडलेले रेशनकार्ड पुन्हा सुरू झाल्या मुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रक्रियेत रेशन दुकान चालक कांतीलाल डांगी यांचे  मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी भूषण शिर्के,दिलीप कानडे , विजय बाबर, मयूर घोडके, अतुल हरपुडे तसेच कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

IMG 20210701 WA0256

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये