डॉक्टरांनी कोरोना काळात केलेले काम विसरता येणार नाही : सचिन दांगट

पुणे : pune city, doctors day १ जुलै डॅाक्टर दिनाचे औचित्य साधुन दरवर्षीप्रमाणे माई मंगेशकर हॅास्पीटल , शतायु हॅास्पीटल यांचे सहित वारजे , कोथरूड आणि पुणे डॅाक्टर असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी असलेले डॅाक्टरांचे शाल , पुष्पगुच्छ, झाडाचे रोप व सन्मानपत्र देऊन भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सचिन दांगट यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. The work done by doctors during Corona’s time cannot be forgotten: Sachin Dangat
यावेळी सिनेअभिनेत्री गौरी नाईक , पुणे जिल्हा युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले , हिजंवाडी गावाचे युवा सरपंच विक्रम साखरे , सुनिल घोरपडे , अरविंद खताळ , किरण साबळे आदि उपस्थित होते .
सचिन दांगट म्हणाले की, भारताचे प्रसिध्द चिकित्सक डॅा.विधानचंद्र रॅाय यांना श्रध्दांजली आणि त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणुन १९९१ सालापासुन १ जुलै हा दिवस भारत देशात डॅाक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो . कोवीड या महामारीचे काळात अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी डॅाक्टरांनी पणाला लावलेले कौशल्य , त्यांचे ज्ञान , कामाप्रती असलेली निष्ठा आणि अनेकांनी गमावलेले प्राण संपुर्ण जगाने पाहिले आहे. डॉक्टरांनी कोरोना काळात केलेले काम कधीच विसरता येणार नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सेवेप्रती आदर आणि आभार व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवशी त्यांचा सन्मान करण्यात आला.




