कोथरुड

उंच उडणाऱ्या पतंगाप्रमाणे यशाची उंची गाठा : कोथरूड मनसेच्या मुलांना पतंग वाटप करत शुभेच्छा !

कोथरूड : आकाशात उंच उंच जाणाऱ्या पतंगाप्रमाणे तुम्हाला जीवनात उत्तुंग यश मिळत जावो अशा शुभेच्छा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोथरूड मधील मुलांना पतंगाचे वाटप करण्यात आले. मनसे पौड रोड शाखेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पतंग मिळाल्यानंतर बाल गोपलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.

महाराष्ट्र नवनर्माण सेना कोथरुड विभागातील शाखा अध्यक्ष विराज डाकवे यांनी आज मकर संक्रांतनिमित्त “पौड रोड शाखा” येथे ‘मोफत पतंग वाटप’ कार्यक्रम घेतला. या उपक्रमाला वॉर्डातील मुलांचा चांगला उदंड प्रतिसाद मिळाला. पतंग मिळाल्यानंतर मुलांनी एकच जल्लोष केला.

सर्वच वयोगटातील मुलांनी पतंग घेण्यासाठी चांगली गर्दी केली होती. सदर पतंग वाटप करताना मनसेचे कोथरुड विभाग निरीक्षक ॲड.किशोर शिंदे, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, जनहित विभाग अध्यक्ष प्रकाश अडसूळ, उपशाखा अध्यक्ष अजिंक्य खळदकर, मनविसेचे आकाश बोबडे, महाराष्ट्र सैनिक पै. गणेश शिंदे, रोहित मोकाटे, सचिन मोरे, अनुराग मोरे, सतिश कदम, सागर शेलार, गौतम शरयू, स्वानंद पवार आदी उपस्थित होते.

Img 20230115 wa0011
Img 20221126 wa02126927299965323449855
कसा जिंकला शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरी किताब

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये