पुणे शहर

कोथरुडमध्ये अरमान सोसायटी मधील रहिवाशांनी साजरी केली एकोप्याची दिवाळी.

पुणे : लॉकडाऊन च्या दोन वर्षांच्या तणावपूर्ण गॅप नंतर कोथरुड तेथे अरमान सोसायटी मध्ये सदस्यांनी एकत्र येऊन आनंदाची दिवाळी साजरी करण्याचा ठरवले. दिवाळी निमित्त सर्व घरासमोर एक सारखे कंदील लावून विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

दरवर्षी भाऊबीजच्याच दिवशी बहिणींच्या स्वागतासाठी म्हणून पूर्ण सोसायटी मध्ये रांगोळी काढण्यात येते विशेष म्हणजे हि रांगोळी सोसायटी मधिल सर्व मुलं आणि मुली सोबतच प्रत्येक घरातील गृहिणी एकत्रित येऊन भली मोठी रांगोळी काढतात. या रांगोळी दरम्यान “येवा कोकण आपलोच असा” असे शिर्षक देऊन कोकणातील गणेशोत्सव, शिमगोत्सव, आंबा, काजू, भात लावणी, बैलगाडा तसेच तीर्थक्षेत्र गणपतीपुळे आणि मार्लेश्वर आदी कोकण संस्कृतीची प्रतिकं रांगोळीतून रेखाटण्यात आली होती.

Img 20221029 wa00057771157107672575607

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची कागदी प्रतिकृती प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आली होती. सायंकाळी हजारो दिवे लाऊन सोसायटीतील महिलांच्या उपस्थित हा दिवाळी दीपोत्सव तेथे मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करण्यात आला.

Img 20221029 wa00077814570465774025398

दरम्यान या दीपोत्सवास पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक किशोर शिंदे, माजी नगरसेविका अल्पना वरपे, गणेश वरपे, कैलास मोहोळ आदी मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवत दीपोत्सवात सहभागी झाले.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजन मनसे शाखा अध्यक्ष – विराज डाकवे यांच्यासोबत सचिन घडशी, दीपक वीर, स्वानंद पवार, प्रसाद घडशी, सागर धुलप, विक्रम पालवकर, राहुल घडशी, योगेश टोले, अभिजित घडशी, विवेक शेंडगे, योगेश घडशी, गणेश दुडये, दिनेश वीर, विशाल डाकवे, म्हादे काका, राजेश टोले, सौरभ घडशी, आर्यन घोलप आदी सदस्यांनी केले.

Img 20220910 wa00253950213425057106133
Img 20221012 192956 045

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये