कोथरुड

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ ; शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांचा सलग सोळा वर्षांपासूनचा स्तुत्य उपक्रम

कोथरुड : दरवर्षी प्रमाणे शिवेसनेचे पुणे महापालिकेतील माजी गटनेते नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या सहकार्याने मनपाच्या आरोग्य विभाग, कीटक विभाग, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत, अतिक्रमण, उद्यान, भवन, गवनी, श्वानपथक अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ व ड्रायफ्रूट बॉक्स वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

पृथ्वीराज सुतार म्हणाले, गेल्या १६ वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व कर्मचारी वर्षभर रात्रं-दिवस जनतेची सेवा करीत असतात, आपल्या सर्वांना त्यांनी वर्षभर कामासाठी केलेल्या सहकार्याची आठवण म्हणून अशा या कौटुंबिक दिवाळी फराळाचे आयोजन करण्याचा मूळ हेतू आहे.

सर्व विभागातील सेवक वर्ग देत सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने फराळ व ड्रायफ्रूट बॉक्सचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख-भारत सुतार व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान(ट्रस्ट) चे अध्यक्ष-सुमित माथवड उपस्थित होते.

Img 20220910 wa00253950213425057106133

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धर्मराज सुतार, शिवराज सुतार, जयराज सुतार, सुधीर वरघडे, गजानन सातपुते, जितेंद्र खुंटे, अनिल भगत, हेमंत मोहोळ, गणेश घोलप, नचिकेत घुमटकर, आकाश सुतार, आप्पा वाघ, विशाल उभे, तुषार दुधाने, वैभव उभे, नवनाथ बनेकर, अक्षय सुतार, महेश चव्हाण, संजय घारमाळकर, सुयोग बांदल, प्रशांत पाटील, अभिजित चव्हाण, संजय डाळिंबकर , निलेश मिस्त्री, राकेश क्षत्रिय, सचिन डाळिंबकर, संजय डाळिंबकर, योगेश क्षीरसागर, निलेश मिस्त्री, भूषण माथवड, परेश नारकर, आदित्य भगत, सुंदर खुडे, अशोक चंदनकेरी, शशिकांत नाकते, गजानन हिंगे, भूषण माथवड यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल भगत यांनी केले व धर्मराज सुतार यांनी आभार मानले.

Img 20221012 192956 045
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये