पुणे शहर

सैन्यदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याची पत्नीवर गोळी झाडून आत्महत्या


पुणे : मुंढवा येथे सैन्यदलातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याची पत्नीवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सैन्यदलातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यानं पत्नीवर गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निवृत्त कर्नल नारायण सिंह बोरा (वय 74) आणि पत्नी चंपा बोरा (वय 63) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावं आहेत.


सैन्यदलातून निवृत्त झालेले निवृत्त कर्नल नारायण सिंह बोरा यांनी आपली पत्नी चंपा बोरा यांच्यावर गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केली. नैराश्यातून ही घटना घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
पत्नी झोपलेली असताना नारायण सिंह बोरा यांनी तिच्या कपाळावर बंदुकीने गोळी झाडून त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास आई फोन उचलत नसल्यामुळं मुलीनं सोसायटीतील सदस्यांकडे याबाबत विचारपूस केली. त्यानंतर सोसायटीतील सदस्यांनी घरी जाऊन पाहिलं तर दरवाजा आतून बंद होता आणि कोणीच दार उघडत नव्हतं. संशय आल्यानं सोसायटीतील सदस्यांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. कोणीच दार उघडत नसल्यानं पोलिसांनी शेजारच्या घराच्या गॅलरीतून घरात प्रवेश केला आणि दरवाजा उघडला. पोलीस ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा दोघंही घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. नैराश्यातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Fb img 1650515749051817962385714415660
Img 20220419 wa0007968353280963622575
Img 20220419 wa0026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये