महाराष्ट्र

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; औरंगाबादहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

औरंगाबाद : शिवसेना(बाळासाहेबांची) आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना औरंगाबादहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Img 20221012 192956 045

दोन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडलेली होती. सोमवारी दुपारी त्रास जाणवू लागल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळीच त्यांना तातडीने एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. 

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली होती.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये