फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी भोर

उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर भर देणार : संजय भोर
पुणे : उद्योजक संजय भोर यांची फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अभय भोर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
संजय भोर हे स्वतः उद्योजक असून उद्योजकांच्या अडचणी ते स्वतः जाणतात. पुढील काळात उद्योजकांना येणाऱ्या समस्या जसे की भांडवलाच्या समस्या, जागेच्या अडचणी, तांत्रिक माहिती, आणि जिल्ह्यातील तरुण तरुणींना उद्योग क्षेत्रात आणण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत.
फोरमच्या माध्यमातून मुंबई, पिंपरी चिंचवड, चाकण, पुणे येथील उद्योजकांच्या अनेक अडचणी सोडविण्यात येतात. तसेच अनेक तरुण तरुणी आणि महिलांना समूह उद्योग योजना कार्यरत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नक्कीच जिल्ह्यातील नव उद्योजकांना भोर यांच्या माध्यमातून एक मोठे पाठबळ मिळणार असल्याचे असोसिएशनने म्हंटले आहे.
संजय भोर म्हणाले की, महाराष्ट्रात जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना सर्व स्तरातील आणि ग्रामीण भागातील तरुण वर्गाकडे पोहोचविणार असून उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यावर भर देणार आहे. फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन च्या माध्यमातून तरुणवर्ग उद्योग व्यवसायाकडे कसा वळेल व त्यांना योग्य मार्गदर्शन कसे मिळेल यावर काम केले जाणार आहे.