संस्कार मंदिर महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर मांडवी बुद्रुक येथे संपन्न..

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हवेली तालुक्यातील मांडवी बुद्रुक येथे युथ फॉर माय भारत अँड युथ फॉर डिजिटल लिटरसी या थीमवर आधारित हिवाळी श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले.
राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. धनंजय त्रिमुखे, डॉ. राजेंद्र थोरात, सरपंच सचिन पायगुडे आणि संदीप महाराज गोगावले, संस्थेचे खजिनदार अविनाश जाधव, संस्थेचे सहसचिव अभ्युदय बराटे, संतोष बराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाले.

या सात दिवसीय शिबिरात मांडवी बुद्रुक या गावाच्या विकासाच्या दृष्टीने, स्वच्छ भारत ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, डिजिटल साक्षरता, भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव, एकपात्री नाट्य प्रयोग तसेच हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.



या शिबिराचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ स्वप्निल गायकवाड व प्रा. अभिजीत परसे यांनी यशस्वी संयोजन केले. भारतीय संविधानातील विचार हा संतांच्या अमृतवाणीतून आलेला आहे. असे माननीय संदीप बर्वे यांनी विचार मांडले. प्रा डॉ. बाबासाहेब जाधव यांनी पेटी व तबल्याच्या सुरात विद्यार्थ्यांसमोर देश प्रेमाने ओथंबलेली अनेक गीत सादर केली व वातावरण देशभक्तीपर केले. राष्ट्र उभारणीत आधुनिक युवकांची भूमिका या विषयावर ह भ प संदीप महाराज गोगावले व गणेश महाराज फरताळे यांचे हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत कीर्तन संपन्न झाले.



आपल्या संस्कृतीमध्ये विधवा महिलांना सन्मान दिला जावा जातीपातीची बंधनं झुगारून सर्वांनी भागवत धर्माची पताका उंच आकाशात फडकवावी असे विचार यावेळी उपरोक्त दोन्ही महाराजांनी व्यक्त केले. मी सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय हा एकपात्री प्रयोग नटश्रेष्ठ कुमार आहेर यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केला. ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांचा त्याग तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त भारतीय महिलांसाठी हिंदू कोड बिल च्या माध्यमातून भारतीय स्त्रियांना अधिकार बहाल केले असे विचार याप्रसंगी कुमार आहेर यांनी मांडले.
डिजिटल साक्षरता आणि आजचा युवा, लोकसंख्येची घनता, भातृभाव व भगिनी भाव आणि लैंगिकता, भारत आर्थिक साक्षरता आणि त्यातील धोके अशा विषयांवर कॉम्रेड दीपक पाटील यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक शिंदे यांनी केले तर आभार डॉ. रायसिंग पाटील यांनी मानले पाहुण्यांचा परिचय डाॅ.प्राजंली विद्यासागर यांनी करून दिला. गावकरी आणि विद्यार्थी यांच्या अतूट बंधनाने आणि माणुसकीने भरलेल्या वारकरी संप्रदायातील सर्व मंडळींमुळे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. ऐतिहासिक विट्ठल रुक्मिणी मंदिरात उपक्रम पार पडले.


