पुणे शहर

यशवंतराव चव्हाण सह्याद्री युवक पुरस्कारासाठी निवड म्हणजे, दहा वर्षांच्या अविरत समाजकारणाची फलश्रुती : स्वप्नील दुधाने

पुणे : pune city, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने कृषी, औयोगिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा २३ वा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री युवक पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांना जाहीर झाला आहे.

यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असलेला कृषी, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील यशस्वी युवकांना हा पुरस्कार दिला जातो. स्वप्नील दुधाने हे कर्वेनगर मधील सामाजिक कार्यकर्ते असून  ‘इ’ तंत्रज्ञानाच्या मदतीने पालिका शाळेतील मुलांची शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल सुरू व्हावी, तसेच समाज सुधारणा व समाजाची समृध्दी यासाठी सातत्याने त्यांचे यशस्वी प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच दुधाने यांची प्रतिष्ठानच्या वतीने या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लवकरच पुण्यात होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Img 20211005 wa0014

हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर स्वप्नील दुधाने यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटले आहे की, गेल्या दहा वर्षांच्या अविरत समाजकारणाचे फलित म्हणजे यंदाच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे देण्यात येणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण सह्याद्री युवक पुरस्काराकरिता झालेली  निवड! हा सन्मान माझ्यासह काम करणाऱ्या असंख्य हातांचा सन्मान असून मी फक्त या हातांचा चेहरा म्हणून हा पुरस्कार स्वीकारत आहे.  कार्यसम्राट यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले स्वच्छ राजकारणाचे कर्तृत्ववान स्वप्न! त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळणे आनंददायी आहे.

गेल्या दहा वर्षांपासून आई सौ. लक्ष्मीताई दुधाने या पुणे मनपाच्या नगरसेविका आहेत. त्यांच्या माध्यमातून व माझ्या संकल्पनेतून भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, राजमाता जिजाऊ महिला बचत गट प्रशिक्षण केंद्र, ग्रंथ महोत्सव, अद्ययावत ग्रंथालय, पुस्तक घर, योगा केंद्र अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांचा राबता करून कर्वेनगर-वारजे परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. हा पुरस्कार याच कामाची फलश्रुती आहे. कर्वेनगर-वारजेच्या नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेल्या पाठिंब्याचा हा गौरव आहे. प्रतिष्ठानाने दिलेल्या या सन्मानासाठी मी त्यांचा अत्यंत ऋणी असून इथून पुढे असेच अविरत कार्य करण्यासाठी हा गौरव माझ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये