गुजरात कॉलनी ते मोकाटे जलतरण तलाव रस्त्यावर सदोष रस्ता दुभाजकामुळे अपघातांची मालिका, तातडीने दुरुस्तीची गिरीश गुरनानी यांची मागणी

कोथरूड : गुजरात कॉलनी कडून जाणारा मोकाटे जलतरण तलाव रस्त्यावर मधोमध रस्ता दुभाजक आहे. त्या दुभाजकावरची उंची खूपच कमी असल्याकारणाने तेथे 4 चाकी वाहनांना आणि इतर मोठ्या वाहनांना देखील तो दुभाजक दिसून येत नाही आणि बऱ्याच वेळा वाहने त्या दुभाजकावर चढली जातात. अशा प्रकारे बरेचसे अपघात कमी उंचीच्या रस्ता दुभाजकामुळे होत आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड क्षेत्रीय कार्यालय येथे सहायक आयुक्त दुदुसकर साहेब यांची भेट घेतली व त्यांना त्या डिव्हायडर ला पिवळ्या लाईट चे हायलाईटर बसवण्याचे सुचविले तसेच त्याचा आजबाजूला पांढऱ्या आणि पिवळ्या कलरचे पट्टे मारावे जेणेकरून 4 चाकी आणि इतर वाहनांना तेथे डिव्हायडर आहे असे समजून येईल आणि अपघात टळतील. या वेळी दुदुसकर साहेब यांनी या विषयावर त्वरित कारवाही करू असे आश्वासन दिले आहे.या वेळी संघटनेचे सहकारी अमोल गायकवाड आणि अमित भगत देखील उपस्थित होते.










