महाराष्ट्रराजकीय

शरद पवारांची मोठी घोषणा! माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही; पक्षाच्या अध्यक्षपदी राहणार

मुंबई: माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असेही शरद पवार यांनी म्हटले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या दोन दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या. अखेर शरद पवार यांनी आज गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पक्षातील विविध घडामोडींवर भूमिका मांडण्यासाठी सविस्तर पत्रकार परिषद घेतली.

पवार म्हणाले, मी घेतलेल्या निर्णयाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उद्रेकाच्या प्रतिक्रीया उमटल्या निर्णय मागे घ्यावा म्हणून देशभरातून अनेक नेत्यांनी विनंती केली आहे. या सर्वांचा आदर राखून मी माझा निर्णय मागे घेत असून आता पक्षासाठी अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार आहे.

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडत होता. शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्ते आणि दिग्गज नेत्यांनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण पवारांनी ती विनंती मान्य केली नाही. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. या घडामोडींवर आज अखेर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली.

Img 20230503 wa00128836785746506742437
Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये