अकरा हजार महिलांना सॅनेटरी पॅड

कांचन कुंबरे यांचा अभिनव उपक्रम
पुणे : भाजपा सरचिटणीस पुणे शहर महिला आघाडी कांचन रुपेश कुंबरे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत कोथरूड विभागातील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना सॅनेटरी पॅड चे वाटप केले.
तसेच येणाऱ्या संक्रांतीनिमित्त ‘ती’ च्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न या उपक्रमा अंतर्गत वस्ती विभागातील 11 हजार महिलांना सॅनिटरी पॅड वाटले जाणार आहेत. असा संकल्प केला. वाढदिवसाच्या दिवशी कोणतीही फ्लेक्स बाजी न करिता अशा प्रकारचे उत्तम आदर्श निर्माण करणारा उपक्रम राबविल्या बद्दल महापौरांनी सौ कांचन कुंबरे यांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमास कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य निरीक्षक मुख्य अधिकारी राम सोनावणे, तसेच इतर आरोग्य निरीक्षक अधिकारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमास दुष्यंत मोहोळ, रुपेश भोसले, अमित तोरडमल, अभिजीत गाडे, रुपेश कुंबरे , अश्विनी भालेकर, मनाली देव उपस्थित होते.
