पुणे शहर

दिवा जिम्नॅशियमतर्फे आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेत बाळा भिवडेने “दीवा श्री” मान पटकाविला.

पुणे : दिवा जिम्नॅशियमतर्फे आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेत बाळा भिवडे विजेता ठरत “दीवा श्री” किताबाचा मान पटकाविला.तर किरण उंबरकर याला द्वितीय आणि कुमार कदम याला तृतीय क्रमांक मिळाला.केळेवाडी मध्ये दिवा प्रतिष्ठानचे दिवा जिम्नॅशियम मामासाहेब मोहोळ शाळा येथे स्पर्धा आयोजित केली होती.

या प्रसंगी माजी उपमहापौर दीपक मानकर, दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुनील वाढवे राव,दत्तात्रय गायकवाड प्रशिक्षक योगेश अहिरे, समर्थ आहीरे, दिलीप कानडे, नवनाथ खिलारे, विजय बाबर हे उपस्थित होते व परिसरातील असंख्य तरुण मुले व जिम मधील मुलं उपस्थित होते.

मानकर म्हणाले, नव्या पिढीला व्यायामाची आवड निर्माण व्हावी या हेतूने दीवा प्रतिष्ठानच्या दीवा जिम्नॅशियमच्या वतीने शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून बक्षिसाच्या रूपाने तरुणांना व्यायामासाठी प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Img 20221228 wa0001281294303512961784024189

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये