अल्पावधीत निर्माण केलेल्या जंबो कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : केवळ १८ दिवसांच्या कालावधीत निर्माण करण्यात आलेल्या पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सीओईपी येथील जम्बो कोविड रुग्णालयाचे आज रविवारी लोकार्पण करण्यात आले. ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले.
यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ,विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने ,आमदार सिद्धार्थ शिरोळे,विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम , पीएमआरडीए चे सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र पोलीस रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमएमआरडीए) आणि राज्य शासन यांच्याकडून केवळ 18 दिवसात सुसज्ज covid-19 रुग्णालय बांधून पूर्ण केले आहे.



