‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला केळेवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद ; अर्ज भरताना अडचण येऊ नये यासाठी हर्षवर्धन मानकर यांच्याकडून नियोजन..

कोथरूड : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला कोथरूड मध्ये मोठा प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मनाकर यांनी सांगितले.
मानकर म्हणाले, कोथरूड मधील विविध भागात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही योजना पोहचवून अर्ज भरून घेतले जात आहेत. केळेवाडी, किष्किंधानगर, सुतारदरा, जयभवानीनगर भागात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांना अर्ज भरताना अडचण येऊ नये असे नियोजन करण्यात आले आहे. प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज भरून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्याचे उमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना गरजू महिलांना आर्थिक पाठबळ मिळावं हा हेतू ठेवून ही योजना सुरू केली. योजना जाहीर झाल्यापासूनच महिला याबाबत विचारणा करू लागल्या होत्या, त्यामुळे योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळणारा हे दिसत होते. पात्र असलेल्या सर्व महिलांपर्यंत ही योजना पोहचली पाहिजे असा आमचा प्रयत्न असल्याचे हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले.










