पुणे शहर

लायसन्स काढण्यासाठी आरटीओचे नवे वेळापत्रक

पुणे : वाहन चालवण्याच्या लायसन्ससाठी दिवसेंदिवस अर्जदारांचे वेटिंग वाढत आहे. याच बरोबर सोशल डिस्टन्सिंगची देखील खबरदारी घेण्याच्या पार्श्वभूमीवर शिकाऊ लायसन्सच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून सकाळी साडेसात ते सायंकाळी सहा या वेळेत नागरिकांना शिकाऊ परवान्याची चाचणी देता येणार आहे.
 
लॉकडाऊननंतर जुलैमध्ये आरटीओचे कामकाज अंशत: सुरू झाले. पहिल्या टप्प्यात वाहन नोंदणीचे काम सुरू करण्यात आले. तर मागील काही दिवसांपासून लायसन्सचे काम सुरू झाले असून, सध्या वाहन परवान्यासह विविध कामे सुरू करण्यात आली आहेत.
 
यापूर्वीच आरटीओने शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी लायसन्स चाचणीसाठी परवानगी दिली आहे. आता लायसन्स काढणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या आणि कार्यालयातील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्यालयाने सोमवारपासून (21 सप्टेंबर) सकाळी 7.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 7 या वेळेमध्ये लायसन्सची चाचणी होणार आहे. नियोजित वेळेनुसार रोज दीड तासांचे एकूण 7 स्लॉट उपलब्ध करून देण्यात येत असून, प्रत्येक स्लॉटमध्ये 100 उमेदवारांप्रमाणे दररोज 700 उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे.
 

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये