पुणे शहर
शैक्षणिक साहित्य व अन्न – धान्यावरील GST विरोधात विद्यार्थी काँग्रेसची पुण्यात निदर्शने

पुणे : शैक्षणिक साहित्य तसेच अन्न -धान्य पदार्थ यावर लावण्यात आलेल्या GST विरोधात आज पुण्यात विद्यार्थी काँग्रेस एनएसयुआय NSUI च्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी कार्यकर्त्यांनी पुणे येथील GST भवन वर निदर्शने करत GST ऑफिसच्या मुख्य फलकावर ‘गब्बर सिंग टॅक्स’ चे पोस्टर लावत जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अमीरभाई शेख, पुणे शहर अध्यक्ष भुषन रानभरे, कोथरुड अध्यक्ष राज गोविंद जाधव, प्रफुल्ल पिसाळ व पदाधिकार उपस्थित होते.
