पुणे शहर

सुरेश कलमाडींची तब्बल 10 वर्षांनी पुणे महापालिकेत एन्ट्री; पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रीय होणार का?

पुणे : काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी पुणे महापालिकेत  आले होते. त्यांच्या येण्याने अनेकजण अवाक झाले होते. तब्बल 10 वर्षांनी त्यांनी महापालिकेत एन्ट्री घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी पुणे महापालिकेत  आले होते. त्यांच्या येण्याने अनेकजण अवाक झाले होते. तब्बल 10 वर्षांनी त्यांनी महापालिकेत एन्ट्री घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कलमाडी हे पुण्याच्या राजकारणातील मोठे नाव होते. पुण्याचे खासदार देखील होते. त्याकाळात त्यांनी  शहरात चांगले कामं केली होती. मात्र काही वर्ष झाले ते राजकारणात सक्रिय नाही आहे. पालिकेत येऊन त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. तब्बल 10 वर्षांनी महापालिकेत आलो आहे. काही परवानग्या हव्या आहेत आणि यापुढे देखील महापालिकेत येत राहीन, असं त्यांनी सांगितलं आहे.

Img 20220804 wa0019951227047229036961

दोन वर्षांनंतर पुणे फेस्टिव्हल मोठ्या जोशात आणि जोमात होणार आहे.  गेल्या 32 वर्षांची पुणे फेस्टिव्हलला परंपरा आहे. त्यांच्याच विविध कामांसाठी आणि परवानग्यांसाठी त्यांनी महापालिकेला भेट दिली होती. 5 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान हे फेस्टिव्हल होणार आहे. गणेश कला क्रिडामध्ये हे फेस्टिव्हल होणार आहे. त्यासोबतच बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, गणेश कला क्रिडा या सगळ्या ठिकाणी जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.  पुणे फेस्टिव्हलच्या आधी हे सगळे मार्ग चांगले करावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी महापालिका आयुक्तांना केली आहे. अरविंद शिंदे, रमेश बागवे आणि इतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

Img 20220801 wa0304

महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आहेत. सगळे पक्ष मोठ्या जोमात कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीकडून महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा रद्द करुन शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या सरकारला धक्का दिला आहे. त्यावरुन घमासान सुरु असताना तब्बल 10 वर्षांनी काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांनी पालिकेला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्याचं चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये