कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकरीता पुणे महानगरपालिका कामगार युनियनची निदर्शने..

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सर्व खात्यातील कंत्राटी पद्धतीने विशेषतः सार्वजनिक स्वच्छता व कचरा वाहतुक विभागात काम करणाऱ्या कंत्राटी सफाईचे काम करणाऱ्या सफाई कामगारांनी पुणे महापालिकेसमोर प्रलंबीत अनेक प्रश्नांसाठी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली.
पुणे महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या निविदा मान्य करत असताना कामगांराच्या संरक्षण करीता नियमाप्रमाणे काही अटीशर्ती आहेत. त्या अटी शर्तीनुसार कामगांराना गणवेश, खराटे, पाट्या, वेतन चिठ्ठी, दिवाळी बोनस, १० तारखेच्या आत म्हणजे वेळेत वेतन देणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरता खोट्या पावत्या सादर करून झालेल्या कामाचे बील पास करून भरपूर नफा कमावणे, ओळखपत्र न देणे, दवाखान्याचे कार्ड न देणे, ठेकेदार जरी बदलला तरी कामगार तोच राहिला पाहिजे पण सर्रास अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कामगांराना कामावरून कमी करणे म्हणजे निविदांच्या अटीशर्तीच्या नियमांचे भंग करणे तसेच कामगार कर्तव्य बजावत असताना आपघात झाला किंवा आजारी पडला तर कोणत्याच प्रकारचा औषध उपचार केला जात नाही. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही निदर्शने करण्यात आली.
कंत्राटी कामगाराच्या किमान वेतन कायद्याची अमंलबजावणी संदर्भात आयुक्तांनी लेखी परिपत्रक काढून देखील त्याची काटेकोरपणे अमंलबजावणी केली जात नाही तसेच अन्य प्रश्नांच्या संदर्भात प्रशासन आयुक्त व लोक प्रतिनिधी यांच्या बरोबर मान्यताप्राप्त संघटने बरोबर लेखी पत्रव्यहार, बैठका झाल्या तरीही कंत्राटी कामगारावर अन्याय अत्याचारात वाढ झालेली आहे हे सर्व माणूसकीला काळीमा फासणारे प्रकार थांबवण्यासाठी आजच्या निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कोविडच्या कालावधीमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना ११ कामगांराचे निधन झाले तरीही त्यांच्या वारसाना प्रशासनाने कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत दिली नाही. ही खेदजनक वेदनादायी व मन विषण्ण करणारी घटना आहे. पण आम्ही युनियन म्हणून कोविडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कंत्राटी कामगाराच्या वारसाना युनियन कडून प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. तसेच आता येथून पुढे प्रलंबीत प्रश्नांच्या संदर्भात रस्त्यावरवरची लढाई तीव्र करणार त्याच बरोबर न्यायालयीन लढाई लढण्या शिवाय पर्याय नाही असे कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यानी सांगीतले. तसेच
कंत्राटी कामगाराच्या मागण्याच्या संदर्भात संबंधीत खात्याचे अधिकारी व मान्यताप्राप्त युनियनच्या पदाधिकार्यां बरोबर १० ऑगस्ट रोजी संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिले. सदर निदर्शनामध्ये कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत गमरे, कॉ. मधुकर नरसिंगे, कॉ. रोहिणी जाधव, कॉ. ओंकार काळे, कॉ. करुणा गजधनी, कॉ. दिलीप कांबळे, कॉ. राम अडागळे कॉ. वैजीनाथ गायकवाड, कॉ. भरत ठोंबरे, कॉ. अनंत मालप यांनी मार्गदर्शन केले. सदर निदर्शनात पाच हजार कंत्राटी कामगारांनी उत्सफूर्तपणे सहभागी झाले. सभेचे सुत्रसंचलन व समारोप कॉ. प्रकाश चव्हाण यांनी केले.