पुणे शहर

पुण्यात उद्या होणाऱ्या कार्यसम्राट महा-आरोग्य शिबिराची जय्यत तयारी; तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यत सर्वकाही मोफत

उद्या रविवार (ता.६) आॕगस्ट, रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत, कृषी महाविद्यालय मैदान, भोसलेनगर, पुणे या ठिकाणी होणार शिबिर

पुणे,ता.५: एक हजाराहून अधिक आजारांवर एकाच ठिकाणी मोफत उपचार मिळावेत या भावनेने सोमेश्वर फाउंडेशन आयोजित ‘कार्यसम्राट भव्य महा-आरोग्य शिबीर’ रविवार (ता.६) आॕगस्ट, रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत, कृषी महाविद्यालय मैदान, भोसलेनगर, पुणे या ठिकाणी होत आहे. शिबिराची जय्यत तयारी होत असून रूग्णांसाठी लागणारे साहित्य, औषधोपचार ,सभामंडप, वाहनतळ आदी गोष्टींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचे उदघाटन लोकप्रिय उपमुख्यमंत्री, माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते रविवार (ता.६). आॕगस्ट रोजी, सकाळी ९ वाजता होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असणार आहेत.

Whatsapp image 2023 08 04 at 7. 14. 19 pm

शिबिरात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ.रमाकांत देशपांडे, हाडांचे तज्ज्ञ डॉ. के.एच संचेती, नेत्र शल्यचिकित्सक डॉ.विकास महात्मे यांच्यासह पुणे, मुंबई येथील नामांकित आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित असणार आहेत.

लोकप्रिय उपमुख्यमंत्री, माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून (ता.२२) जुलै २०२३ पासून शिबीराची सुरवात करण्यात आली. तीन टप्प्यांत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २२ ते ३० जुलै या कालावधीत घरोघरी जाऊन रूग्णांची पुर्व तपासणी व नोंदणी केली करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात
३१ जुलै ते ४ आॕगस्ट या कालावधीत, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पंचवीस ठिकाणी, पूर्व तपासणी, प्राथमिक उपचार, मुख्य शिबीराची नोंदणी, ५२ प्रकारच्या रक्त चाचण्या, एक्स-रे, सोनोग्राफी, इ.एम.जी, इ.सी.जी, २-डी इको, इ.इ.जी, मेमोग्राफी (स्तनाच्या कॅन्सरची तपासणी) पी.एफ.टी करण्यात आली.

Img 20230803 wa00041486684870724290474

तिसऱ्या टप्प्यात रविवार (ता.६). आॕगस्ट रोजी मुख्य शिबीर होणार आहे. यावेळी मोफत सल्ला, तपासणी-चाचणी, औषधोपचार व पुढील शस्रक्रिया केली जाणार आहे. यामध्ये नेत्ररोग, अस्थिव्यंग उपचार, मेंदू रोग, मुत्र रोग, नाक – कान – घसा, कर्करोग, जनरल मेडिसीन, ग्रंथीचे विकार, त्वचा व गुप्तरोग, अयुष हृदयविकार, जनरल सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, दंतरोग, श्वसन विकार व क्षयरोग, लठ्ठपणा, जेनेटिक विकार, मानसिक आरोग्य अशा अनेक आजारांवर मोफत तपासणी,औषधोपचार, शस्रक्रीया केली जाणार आहे. गरजू नागरिकांनी आधिक माहितीसाठी  ८३०८१२३५५५ या नंबरवर संपर्क करावा किंवा www.sunnynimhan.com या वेबसाईटवर नोंदणी करावी.

Img 20230511 wa000228129
Img 20230717 wa0012
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये