पुण्यातील शिवाजीनगरमध्ये उड्डाण पुलावर दुधाच्या टँकरचा अपघात; दुध व ऑईल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडले.

पुणे : शिवाजीनगर येथील राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर दुधाच्या टँकरचा अपघात झाल्याने वाहनचालक जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुध व ऑईल सांडले असल्याने अग्निशमन दल दाखल झाले असून नागरिकांनी सद्यस्थितीत सदर रस्त्याने वाहने चालविताना विषेश काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिवाजीनगर राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर दुधाच्या टँकरचा अपघात झाला आहे. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुधाचा टँकर पलटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दूध आणि ऑईल सांडले आहे. सद्यस्थितीत या भागात वाहने चालविताना विषेश काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात वाहन चालक जखमी झाल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या वाहनचालकावर उपचार सुरू आहेत.
दूधाचा टँकरचा अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणावर दूध वाया गेले आहे. तसेच अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून दूधाचा टँकर बाजूला घेण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.















