पुणे शहर

दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; कर्वेनगर मधील धक्कादायक घटना

पुणे : दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कर्वेनगर मधील काकडे सिटी येथे शुक्रवारी (ता.७) रात्री आठच्या सुमारास घडली आहे. आदी अमित कर्वे (वय-15 रा. काकडे सिटी, कर्वे रस्ता) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

आदी, त्याचे आई-वडील व बहिण असे चारजण काकडे सिटी परिसरात राहतात.आदीचे वडील एका खासगी बँकेत नोकरी करतात तर आई अभिनव शाळेत शिक्षिका आहे. मोठी बहिण महाविद्यालयात शिक्षण घेते तर आदी जवळच्या शाळेत 10 वी मध्ये शिकत होता. शुक्रवारी घरातील सर्वजण आपापल्या कामाला निघन गेल्यानंतर आदी घरात एकटाच होता.

सायंकाळी आदीची मोठी बहिण घरी आल्यानंतर तिला आदीने घरामध्ये गळफास घेतल्याचे दिसले. तिने तात्काळ याची माहिती आई-वडिलांना दिली.आदीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याबाबत
वारजे माळवाडी पोलिसांनी खबर देण्यात आली.आदीने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस तपास करीत आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789
Img 20220108 wa0160
Img 20220108 wa00017959239917361251506
Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये