राष्ट्रीय

5 राज्यांमध्ये 7 टप्प्यांत मतदान, 10 मार्चला मतमोजणी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत.
सर्व राज्यांमधल्या निवडणुका एकूण 7 टप्प्यांमध्ये घेतल्या जातील.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी 14 जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल. अर्ज भरण्याची तारीख 21 जानेवारी तर मागे घेण्याची तारीख 27 जानेवारी असेल. तर मतदान 10 फेब्रुवारीला होईल. दुसऱ्या टप्प्यात 4 राज्यांमधे निवडणुका होतील. उत्तर प्रदेशचा हा दुसरा टप्पा असेल तर उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा असेल. 21 जानेवारीला नोटिफिकेशन निघेल. अर्ज भरण्याची तारीख 27 जानेवारी तर मागे घेण्याची मुदत 31 जानेवारी तर मतदानाची तारीख 14 फेब्रुवारी असेल.

फक्त उत्तर प्रदेशचा तिसरा टप्पा नोटिफिकेशन 25 जानेवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख 1 फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत 4 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 20 फेब्रुवारी असेल. चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख 27 जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख 3 जानेवारी, मागे घेण्याची तारीख 7 फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख 23 फेब्रुवारी असेल.

Img 20220108 wa00017959239917361251506

उत्तर प्रदेशचा पाचवा आणि मणिपूरचा पहिला टप्पा नोटिफिकेशन 4 फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख 11 फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख 16 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 3 मार्च असेल.उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी नोटिफिकेशन 10 फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख 17 फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख 21 फेब्रुवारी आणि मतदान 7 मार्चला असेल. मतमोजणीची तारीख 10 मार्च असेल.

Img 20220108 wa0160

कोरोना नियमावली
सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स मानलं जाईल आणि त्यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. कोणत्याही प्रकारे रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली वगैरेला 15 जानेवारीपर्यंत परवानगी दिली जाणार नाही. उमेदवारासह जास्तीत जास्त 5 लोकांना डोअर टू डोअर प्रचार करता येईल. सार्वजनिक रस्ते, चौकात कोणत्याही नुक्कड सभांना परवानगी दिली जाणार नाही.

Img 20220105 wa00031311456043270984558

प्रचार डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीने करण्याचा सल्ला
मतदानाचा कालावधी सर्व पाच राज्यांमध्ये एका तासाने वाढवण्यात आला आहे. संपर्कविरहीत प्रचार व्हावा यासाठी दूरदर्शनवर सर्व पक्षांना मिळणारा कालावधी दुप्पट करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी शक्य तेवढा प्रचार डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीने करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्यतो प्रत्यक्ष प्रचार टाळावा. यासंदर्भातली सविस्तर नियमावली नंतर जारी करण्यात येईल.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये