पुणे शहर

सुरेखा पुणेकर यांनी दिले प्रविण दरेकर यांच्या टीकेला उत्तर..

पुणे : pune city विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल शिरूर येथे बोलताना लोककलावंत सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाबाबत आक्षेपार्ह विधान करत महिलांचा अपमान केला होता, त्याला आता सुरेखा surekha punekar पुणेकर यांनी उत्तर दिले असून दरेकर यांनी महिलांची माफी मागावी अन्यथा महिला शांत बसणारा नाहीत असा इशारा त्यांनी दिला आहे. Surekha Punekar’s reply to Pravin Darekar’s criticism

लोक कलावंत सुरेखा पुणेकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत शिरूर येथील कार्यक्रमात बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका केली होती . या टीकेला आता सुरेखा पुणेकर यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष आहे आणि म्हणूनच मी या पक्षात प्रवेश करत आहे.

दरेकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर करु
नका. मात्र महिलांची अपमान करण्याचा अधिकार त्यांना  कुणी दिला आहे  असा प्रश्न सुरेखा पुणेकर यांनी विचारला आहे.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये