कोथरुड

वस्तीविभागातील गरजू मुलींनी त्यांना नेमकी कश्या प्रकारची मदत हवी आहे ते मला पत्र लिहून कळवावे – चंद्रकांत पाटील


पतित पावन संघटनेच्या माध्यमातून मोफत ड्रेस वाटप कार्यक्रम संपन्न

पुणे : कोरोनाच्या संकटकाळात अनेक कुटुंबांची वाताहात झाली, अनेक कुटुंबातील कर्त्यांचे रोजगार बुडाले अश्यांना आधार देण्यासाठी एक हात मदतीचा उपक्रम सुरु केला असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.वस्ती विभागातील गरजू मुलींनी त्यांना नेमकी कश्या प्रकारची मदत हवी आहे ते मला पत्र लिहून कळवावे, मी सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेन असे भावनिक आवाहन ही चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोथरूड मधील शास्त्रीनगर येथे पतित पावन संघटनेच्या माध्यमातून गरजू मुलींना शिलाई सह मोफत ड्रेस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, स्थानिक नगरसेविका अल्पना वर्पे,श्रद्धा प्रभुणे, नगरसेवक किरण दगडे पाटील, भाजप पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर,भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,कोथरूड महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, स्वीकृत सदस्य बाळासाहेब टेमकर, प्रभाग अध्यक्ष कैलास मोहोळ, सागर कडू, पतित पावन संघटनेचे पुणे शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, शहर पालक मनोज नायर, कोथरूड चे अध्यक्ष सुनील मराठे,जयश्री टेमघरे,पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझीरे, सुवर्णा काकडे, दीपक काळभोर, दत्तात्रेय गांडले, लता उभे, उज्ज्वला हवाले, रामभाऊ जोरी,अर्जुन विधाटे,इ मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळात अनेक कुटुंबातील मुलींना गेल्या दीड वर्षात नवीन ड्रेस सुद्धा शिवता आला नाही, त्यामुळे वस्ती विभागातील गरजू मुलींना शिलाई सह उत्तम दर्ज्याचे ड्रेस शिवण्याचा निर्धार केला आणि त्यालाच अनुसरून हा कार्यक्रम होत असल्याचे आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

Img 20210913 wa0011 1

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पतित पावन संघटनेचे शहर उपाध्यक्ष जालिंदर टेमघरे व जयश्री टेमघरे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली व चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या बचत गटाला भेट दिलेल्या शिलाई मशीन वरच हे ड्रेस शिवण्यात येतील व त्याआधारे आम्हाला आमच्या कुटुंबाच्या खर्चात हातभार लावता येईल असे त्यांनी सांगितले.200 मुलींना ड्रेस वाटप झाल्यानंतर त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि आनंदाश्रू बरेच काही सांगून जात होते. भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर पतित पावन संघटनेचे सुनील मराठे यांनी सूत्रसंचालन केले, जालिंदर तथा पप्पू टेमघरे व जयश्रीताई टेमघरे यांनी संयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये