पुणे शहर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जागरूक राहण्याची गरज : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षक पालक यांच्यासह समाजातील सर्व घटकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातंर्गत परिमंडळ 4 च्यावतीने शाळांचे प्रमुख प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यासाठी आयोजित “शालेय विद्यार्थी सुरक्षा आणि पोस्को कायदा” याविषयी कार्यशाळा व पोलीस आयुक्त यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त गुप्ता बोलत होते.

या कार्यशाळेत एमआयएच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुरी पवार यांनी पोस्को कायदा तर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यसनमुक्ती याविषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सहाय्यक शिक्षण संचालक मीना शेंडकर, महापालिकेच्या शिक्षण अधिकारी मीनाक्षी राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, आरती बनसोडे यांच्यासह परिमंडळ चार विभागातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


परिमंडळ चार विभागात निर्भय विद्यार्थी अभियान ही मोहीम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त रोहिदास पवार यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा या मोहिमेला या कार्यशाळेच्या निमित्ताने सुरुवात करण्यात आली. पोस्को कायद्याची जनजागृती तसेच व्यसनमुक्ती या दोन्ही विषयांवर परिमंडळ 4 विभागातील शाळांमध्ये यापुढील काळात नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी परिमंडळ विभागातील सामाजिक संस्थांची देखील मदत घेतली जाणार असल्याची माहिती उपायुक्त पवार यांनी दिली. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी सहभागी मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या विविध शंकांचे संवाद साधून निराकरण केले. पुणे शहर पोलिसांच्या वतीने बालकांवरील अत्याचार या गंभीर विषयासंदर्भात शालेय शिक्षण विभाग तसेच समाजातील जागृत घटकांनी गांभीर्याने काम करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त गुप्ता यांनी दिल्या. निर्भय विद्यार्थी अभियान उपक्रमाच्या ध्वनि-चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. उपक्रमाची माहिती दिलीप कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविकात दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निर्भय विद्यार्थी अभियानाचे सदस्य विजय शिवले, माजी नगरसेविका सुलभा क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या पोर्णिमा गादिया, निखिल गायकवाड यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार समितीचे सदस्य विवेक देव यांनी मानले.

Fb img 1647413711531
Img 20220801 wa0304

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये