पुणे शहर

पोहण्याचे तलाव लवकरच सुरु होतील- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : ज्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले आहेत त्यांना तलावात पोहण्यासाठी ( स्विमिंग टँक) परवानगी देण्याच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद असल्याने पोहण्याचे तलाव लवकरच सुरु होतील, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. त्या बैठकीत, ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे झाले आहे त्यांना पोहण्याच्या तलावात प्रवेश द्यावा अशी सूचना आमदार शिरोळे यांनी केली. त्या मागणीला उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पोहण्याचे तलाव लवकरच सुरु करत आहोत, असे आश्वासन शिरोळे यांना दिले.

Img 20210913 wa0011 1

कोविड प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसची गरज आहे का? यावर प्रशासनाने अभ्यास करावा, वस्ती भागातील जे नागरिक लस घ्यायला घाबरत असतील त्यांचे प्रबोधन शासनाने घरोघर जावून करावे, कोरोना कंट्रोल मॉडेलसाठी झालेल्या प्रयत्नांचे डॉक्युमेंटेशन व्हावे, अशा सूचना आमदार शिरोळे यांनी केल्या.
गणेशोत्सव काळात कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलीसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये