स्वप्नील दुधाने यांच्या प्रयत्नातून कर्वेनगर, वारजेतील नागरिकांसाठी कायमस्वरुपी आधार केंद्र सुरू ..

कर्वेनगर : pune city, karvenagar परिसरातील नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा कशा देता येतील याबाबतचा कायम विचार व त्याबाबतचे प्रयत्न हे वारकरी संप्रदायाचे पायिक असणाऱ्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने हे मायलेक करत असतात, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. भालचंद्र कापरेकर यांनी केले.
नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या महापालिकेच्या विकास निधीतून व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या संकल्पनेतून शाहू कॉलनी गल्ली क्रमांक २, १०० फुटी डिपी रस्त्याला करण्यात आलेल्या आरोग्य सेवा कोठी कार्यालय, आधार केंद्र, शाहू कॉलनी जेष्ठ नागरिक कट्टा व कै. वसंत बगाटे वाचनालयाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी, उद्योजक विठ्ठलराव शेवाळे, खेळाडू व योगा प्रशिक्षक जितेंद्र शहा, व भालचंद्र कापरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदिनी बगाडे, प्रमोद शिंदे, अजिंक्य दुधाने व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
कापरेकर म्हणाले, स्वप्नील दुधाने यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत आणि म्हणूनच परमार्थामध्ये पुढे पहीचे असते हे त्यांना माहीत असल्याने दुरदृष्टी ठेवून ते आपल्या भागाचा विकास करत आहेत. लोकांना योग्य वेळी योग्य ठिकाणी नेतो त्याला नेता म्हणतात आणि हे गुण दुधाने यांच्यामध्ये आहेत. दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व याचा संगम त्यांच्यामध्ये असल्याचे त्यांच्या कामावरून दिसत आहे. आज लोकांसाठी गरजेच्या असलेल्या कामांची उद्घाटने करण्यात आली आहेत. जेष्ठ नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी ते प्रयत्नशील असतातच पण ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग परिसराच्या विकासासाठी कसा करता येईल याचाही ते विचार करत असतात.
यावेळी बोलताना स्वप्नील दुधाने म्हणाले की, नागरीकांना काचाऱ्याविषयी, स्वच्छतेबाबत काही अडचणी असल्यास त्यांना त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे आरोग्य सेवा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या नोंदी त्यांचे कामकाजाचे नियोजन या कार्यालयामार्फत होणार आहे. सफाई कर्मचारी पहाटे पासून ते दुपारपर्यंत स्वच्छतेची कामे करत असतात परंतु संध्याकाळी काही नागरिक व विद्यार्थ्यांकडून रस्त्याच्या कडेला कचरा आणून टाकला जातो, तो सकाळी उचलला जातो पण नागरिकांच्या सहभागातून परिसराचा विकास साधला जातो व त्यासाठी आम्हाला नागरिकांच्या सहकार्याची जास्त गरज आहे.



सुरू करण्यात आलेले आधार केंद्र हे कायमस्वरूपी असणार असून त्या ठिकाणी आधार संदर्भातील नागरिकांची सर्व कामे केली जाणार आहेत. आता कमी संख्येने असणाऱ्या आधार केंद्रांमुळे एकाच ठिकाणी जास्त गर्दी होत असल्याने नागरिकांना ताटकळत त्या ठिकाणी थांबावे लागते. आपल्या भागातील नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हे कायमस्वरूपी आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच डीपी रस्त्याला चालण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हक्काचे ठिकाण असावं यासाठी हा ज्येष्ठ नागरिक कट्टा सुरू करण्यात आला असून त्याचा फायदा या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना होणार असल्याचे स्वप्नील दुधाने यांनी यावेळी सांगितले.
इलेक्ट्रिक वाहने सुरक्षित आहेत का?
कर्वेनगर मधील बंगल्याला का आली महापालिकेच्या नावाने खोटी नोटीस खालील लिंकवर क्लिक करा..







